दिल्लीपुढे झुकणं जमलं नाही; २७ तारखेला जाणार ईडीच्या कार्यालयात : पवार


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळेच कारवाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, दिल्लीच्या तख्तापुढे झुकणं आम्हाला माहित नाही अशा शब्दात पवारांनी भाजप सरकारला थेट आव्हान दिलं आहे.

माझ्या आयुष्यात गुन्हा दाखल होण्याचा हा दुसरा प्रसंग असल्याचेही शरद पवार यांनी सांगितलं.

तर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मी २७ तारखेला दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच या घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांना सगळी माहिती देणार असून अन्य काही पाहुणचार जर हवा असेल तर त्याची पण माझी तयारी असेल असा टोलाही पवार यांनी सरकारला लगावला.

तसेच या प्रकरणी तपास करणाऱ्या सर्व यंत्रणांना मी सहकार्य करणार असल्याचंही पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post