अवकाशातून कोसळतंय प्लास्टिक; कारण जाणाल तर चकित व्हाल


वेब टीम : अलास्का
प्लास्टिक’ मुळे होत असलेले प्रदूषण ही एक जगातील मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. प्लास्टिकचे सूक्ष्म कण सागरी जीवन प्रभावित करत आहे.

तर असेच कण मानवी भोजनातही समाविष्ट होत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून समुद्राच्या पाण्यात, पिण्याच्या पाण्यात आणि अनेक जीवांमध्येही प्लास्टिकचे कण आढळून येत आहे.

ही चिंताजनक बाब एका नव्या संशोधनातून स्पष्ट झाली आहे. यामध्ये असेही सांगण्यात आले आहे की, अवकाशातून बर्फाबरोबर प्लास्टिकचे नॅनो कणही जमिनीवर कोसळत आहेत.

बर्फाबरोबर प्लास्टिकचे सूक्ष्म कण कोसळण्याची स्थिती आर्क्टिक, आल्पस आणि अन्य ठिकाणी प्रामुख्याने आढळून येत आहे.

जर्मनीतील अल्फे्रड वॅगनर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान असे आढळून आले की, प्लास्टिकचे नॅनोकण विविध माध्यमातून वातावरणात पसरतात आणि ते हिमपाताबरोबरच जमिनीवर कोसळतात.

हे संशोधन हेल्गोलँड (जर्मन द्विप), बवेरिया (जर्मनी), आर्क्टिकमधील बर्फावर करण्यात आले. या बर्फामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्मकण असल्याचे आढळून आले.

‘सायन्स जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार प्लास्टिकचे सूक्ष्म हवेच्या माध्यमातून वातावरणात पसरतात.

जर्मनीतील एक राज्य बवेरिया येथे तर एक लिटर पाण्यात प्लास्टिकचे तब्बल 1,54,000 नॅनो कण आढळून आले. हे प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post