भाजप सरकारने अर्थव्यवस्था पंक्चर केली : प्रियांका गांधी


वेब टीम : दिल्ली
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्था पंक्चर केली आहे,’ केल्याचे प्रियांका यांनी ट्विटमध्ये म्हटले.

प्रियांका आपल्या ट्विट मध्ये म्हणाल्या,”गेल्या काही दिवसांपासून देशात मंदीचे वातावरण आहे. वाहन उद्योगांसह अन्य क्षेत्रांत नोकरकपातीला सुरुवात झाली आहे.

जीडीपी दर खाली आला आहे.” याच मुद्द्यांवरून प्रियांकांनी सरकारला धारेवर धरले.”देशाच्या अर्थव्यवस्थेचे किती हाल झाले आहेत हे जीडीपीच्या दरावरून स्पष्ट दिसते. ना जीडीपी वाढला आहे ना रुपया बळकट झाला.

रोजगार मिळेनासे झाले. अर्थव्यवस्थेचा सत्यानाश करण्याचा हा कारनामा कोणाचा हे आतातरी सांगून टाका,”असे आव्हानच प्रियांकांनी सरकारला दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post