२५ वर्षे थांबलेल्या विकासाला मी चालना दिली : आ. संग्राम जगताप


वेब टीम : अहमदनगर
नगर शहराला नावे ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही. स्वत:च्या राजकारणासाठी शहर बदनाम करण्याचा अनेकांचा डाव आहे. गेली पंचवीस वर्षाच्या थांबलेल्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे.

आता आमचे सरकार नाही मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, असे मी कधीही सांगत बसलो नाही, विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा विकासकामे मंजूर होत असतात. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. शहराला जोडणारे रस्त्याचे कामे मंजूर करुन नेटवर्क उभे केले आहे. असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

टिळकरोडवरील आरोग्य नगर व पटेलवाडी येथे रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. मनोहर वीर, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. अशोक नरवडे, डॉ. महेश वीर, डॉ.अमित कुलांगे, डॉ.दिपक करपे, डॉ.रामदास बांगर, डॉ. रविंद्र भोसले, संजय कराळे, अरविंद डिक्कर, डॉ.भगवान कलानी, प्रा.सिताराम काकडे, अभिजित खोसे, डॉ.मॉरीस पारधे, डॉ.सुप्रिया वीर, डॉ.प्राजक्ता पारधे, डॉ.निलोफर धानोरकर, डॉ.सुजाता नरवडे, डॉ.दिपाली फाळके, डॉ.सारिका बागर, डॉ.मंजुषा देवकर, डॉ.सारिका झटेकर, डॉ.प्रताप पठारे, डॉ.दिपाली पठारे, डॉ.स्वाती कुलांगे, दुरलभ पटेल, पुरुषोत्तम पटेल, नंदू एकाडे, विलूभाई पटेल, नरसीभाई पटेल, अमृतभाई शहा, प्रकाश अकोलकर, किशोर पटेल, मदन पटेल, महेंद्र चंदे, पंकज पटेल, भारत पटेल, विशाल पटेल, विपुल शहा, धिरज काबरा, राकेश गांधी, परेश पटेल आदी नागरिक उपस्थित होते.

आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले, आरोग्य नगर येथे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहे. याठिकाणी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. रुग्णांची नातेवाईकांची हेळसांड होउ नये यासाठी रस्त्याची कामे मंजूर केली. आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा आहे. डॉक्टरचे प्रश्न मार्गी लावणे हे माझे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ.महेश वीर म्हणाले, टिळकरोडवरील आरोग्यनगर परिसरात हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांची व नातेवाईकांची संख्या मोठी आहे. या भागात रस्ता नसल्यामुळे ये-जा करण्यासाठी हाल होत होती, पावसाळ्यात चालणेही कठीण झाले होते. आ.संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच निधी उपलब्ध करुन दिला. त्याबद्दल आम्ही सर्व डॉक्टर आ.जगताप यांचे आभार मानतो.

अमृतभाई शहा म्हणाले- पटेलवाडी परिसरातील रस्त्याचे काम होणे गरजेचे होते. आ.जगताप यांनी आम्हाला रस्त्याचे काम करुन दिले, नगर शहराला विकासकामे करणारा तरुण आमदार मिळाला आहे. सर्व समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम ते करतात तसेच सर्वांना एकत्र आणुन शहराच्या विकासाला चालना दिली असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post