'या' कारणांमुळे पुण्यात झाली ढगफुटी


वेब टीम : पुणे
मान्सूनच्या वार्‍यांचे प्रवाह सक्रिय नसल्यामुळे परतीच्या मान्सूनच्या काळातील उंच ढगांची निर्मिती होत आहे.

पुण्यासह बऱ्याच भागात १२ ते १५ किलोमीटर उंचीच्या ढगांची निर्मिती झाली होती. या ढगांमुळेच शहरात सलग दोन दिवस ढगफुटीसारखा पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

‘क्युमुलोनिंबस‘ प्रकारच्या या ढगांमुळेच कमी कालावधीत जास्त पाऊस झाला.

पुण्यात मंगळवार आणि बुधवारी रात्री मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. पाणी शिरल्याने लाखो घरांचे नुकसान झाले.

पुण्यासह राज्याच्या बऱ्याच भागांत झालेल्या मुसळधार पावसादरम्यान बऱ्याच ठिकाणी १२ ते १५ किलोमीटर उंचीच्या ढगांची निर्मिती झाली होती. तसे मुंबई आणि सोलापूरच्या रडारवरून दिसून आले होते.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पुणे आणि शहराच्या दक्षिण-पूर्व भागात नऊ ते १२ किलोमीटर उंचीपर्यंतच्या ढगांची निर्मिती झालेली दिसली.जमिनीपासून दीड ते सहा किलोमीटर उंचीपर्यंत या ढगांची घनता अधिक होती.

’क्युमुलोनिंबस’ प्रकारचे हे ढग होते. या ढगांमुळेच अत्यंत कमी कालावधीत प्रचंड पाऊस होतो. त्यामुळेच शहरात अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाला.

हवामान विभागाने अद्याप मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू केल्याचे जाहीर केले नाही. मात्र पावसाची तीव्रता बघता मान्सूनचा हंगाम संपत आल्याची लक्षणे असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

 बंगालच्या उपसागरावरून येणार्‍या या वार्‍यांसोबत आलेल्या बाष्पामुळे दक्षिण भारत, महाराष्ट्रासह मध्य भारतात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत.

दरम्यान पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, त्यानंतर या विभागांत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post