अरे बाप रे... आता चक्क गुलमोहोराच्या झाडाचीही चोरी


वेब टीम : अहमदनगर
लालटाकी रोडवरील जुना सर्व्हे नं. 119, सिटी सर्व्हे 6998 मध्ये असलेले जुने वाढलेले सुमारे 5 हजार रूपये किंमतीचे गुलमोहराचे झाड तिघांनी तोडुन चोरून नेले.

ही घटना गुरूवारी (दि.26) दु. 12.30 च्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, लालटाकी परिसरातील नेहरू पुतळ्यालगत असलेल्या नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या जागेत (जुना सर्व्हे नं. 119, सिटी सर्व्हे 6998) वाढलेले जुने गुलमोहराचे झाड गुरूवारी दुपारी रियाज रफिक तांबटकर (रा. गोकुळवाडी सर्जेपुरा) व त्याच्या अन्य दोन अनोळखी साथीदारांनी तोडुन कापुन चोरून नेले.

ही ट्रस्टची जागा दुर्लक्षित असल्याने यापुर्वीही येथेही चोरीच्या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अॅड. जावेद खुदाबक्ष तांबटकर (रा. जीपीओ रोड, नगर) यांच्या फिर्यादीवरून भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस नाईक तरटे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post