आमचं लोकसभेच्यावेळीच ठरलंय; लवकरच युतीची घोषणा : उद्धव ठाकरे


वेब टीम : मुंबई
भाजप- शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, फॉर्म्युलाही ठरला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचा फॉर्म्युला ठरला आहे. यावेळी मी वेगळी पद्धत अवलंबली आहे, मुख्यमंत्री उमेदवारांची यादी तयार करून देतील ती आमच्या नेत्यांशी चर्चा करून युती जाहीर होईल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

युतीत कोणाताही तणाव नाही. लवकरच युतीची घोषणा होईल, लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा फॉर्म्युला ठरला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

भाजपचा नवा प्रस्ताव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांची जागावाटपावर रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार शिवसेना 126 तर भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा असा प्रस्ताव भाजपने दिल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ठरलेला हा फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह 22 तारखेला मुंबईत येणार आहेत. त्यावेळी या जागावाटपांचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post