वेब टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 144 जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असं विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्या...
वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 144 जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असं विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली.
रावते यांच्या या भूमिकेचं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. रावते काहीच चुकीचे बोलले नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेमुळं युतीच्या जागावाटपाचा तिढा आणखी वाढला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपावर अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊ शकली नाही.
त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी 144 जागांची मागणी केली आहे. ’शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटू शकते,’ असं रावते म्हणाले. त्यांच्या या विधानाचं खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे.
COMMENTS