--> #HowdyModi : स्वतःचा देश चालवता येईना अन् चालले काश्मीर मागायला : ट्रम्पसमोर मोदींचा पाकिस्तानला टोला | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

#HowdyModi : स्वतःचा देश चालवता येईना अन् चालले काश्मीर मागायला : ट्रम्पसमोर मोदींचा पाकिस्तानला टोला

वेब टीम : ह्युस्टन हाऊडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच पाकिस्तानला...


वेब टीम : ह्युस्टन
हाऊडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच पाकिस्तानला इशारा दिला.

कलम 370 रद्द केल्यानंतर बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं नाव न घेता मोदींनी त्यांना टोला लगावला.

दहशतवादाविरोधातल्या लढाईत अमेरिका नेहमीच भारतासोबत असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयामुळे ते लोक (इम्रान खान) अस्वस्थ आहेत. ज्या लोकांना आपला देश सांभाळता येत नाही त्यांना अशांती हवी आहे, अशी टीका मोदींनी नाव न घेता पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर केली.

या लोकांना अशांती हवी आहे, हे लोकं दहशतवाद पोसत आहेत. तसेच दहशतवादाचं समर्थन करत आहेत. त्यांना तुम्ही चांगलच ओळखता. अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला असो किंवा मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला असो, या हल्ल्यांचे मास्टरमाईंड कुठे सापडतात? असा सवाल मोदींनी विचारला.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढाई लढण्याची वेळ आता आली आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर एनआरजी स्टेडियममध्ये उपस्थित जवळपास 50 हजार लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प दहशतवादविरोधात उभे आहेत. दहशतवादाविरोधातील या लढाईत अमेरिका आणि इस्राईल मोठ्या ताकदीने उभे आहेत, असं मोदींनी सांगितलं.

मोदींनी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्याचा उल्लेखही केला. भारतातून कलम 370 ला फेअरवेल दिल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

भारतासमोर 70 वर्षांपासून एक मोठं आव्हान होतं, ज्याला काही दिवसांपूर्वी फेअरवेल देण्यात आलं. आम्ही कलम 370 देशातून हद्दपार केलं आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना ते हक्क दिले, ज्यापासून ते गेली 70 वर्ष वंचित होते.

आमच्या सरकारने गेल्या 70 वर्षांपासून चालत आलेलं कलम 370 रद्द केलं. त्यामुळे संविधानातील जे अधिकार इतर भारतीयांना मिळत होते तेच अधिकार आता जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना मिळणार आहेत. त्यामुळे एक प्रकारचा भेदभाव नष्ट झाला आहे, असं मोदी म्हणाले.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: #HowdyModi : स्वतःचा देश चालवता येईना अन् चालले काश्मीर मागायला : ट्रम्पसमोर मोदींचा पाकिस्तानला टोला
#HowdyModi : स्वतःचा देश चालवता येईना अन् चालले काश्मीर मागायला : ट्रम्पसमोर मोदींचा पाकिस्तानला टोला
https://1.bp.blogspot.com/-NFP5GxD_w5o/XYgwwEM1cQI/AAAAAAAAEt4/XtO6xgohGyUuVIa09GK3MBQU3jG8NUW3QCLcBGAsYHQ/s320/IMG_20190923_005928.jpg
https://1.bp.blogspot.com/-NFP5GxD_w5o/XYgwwEM1cQI/AAAAAAAAEt4/XtO6xgohGyUuVIa09GK3MBQU3jG8NUW3QCLcBGAsYHQ/s72-c/IMG_20190923_005928.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/09/howdymodi-modi-on-pakistan.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/09/howdymodi-modi-on-pakistan.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content