एनएसए अजित डोवाल सौदी अरेबियात; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा


वेब टीम : रियाध
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयामागची भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारत सौदी अरेबियाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा करणार आहे.

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रियाधमध्ये आले. या भेटीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा होईल.
काश्मीर मुद्दावर मोहम्मद बिन सलमान यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा रियाधमध्ये थांबले होते.

काश्मीर मुद्दावर पाकिस्तानची बाजू त्यांनी मांडली. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा दौरा महत्वाचा ठरत आहे.

डोवाल यांच्या दौऱ्यातून सौदी बरोबरचे द्विपक्षीय संबंध भारतासाठी किती महत्वाचे आहेत ते मोदी सरकारने दाखवले.

एनएसए अजित डोवाल फक्त मोदींचे विश्वासू सहकारीच नाहीत तर काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर स्वत: त्यांनी तिथे तळ ठोकत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post