पवारांनी ईडीच्या प्रकरणाचा इव्हेंट केला : चंद्रकांत पाटील


वेब टीम : कोल्हापूर
कोल्हापुरातील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण आणि समाजकारणातून शरद पवार यांना कायमची निवृत्ती देणार’ असं वक्तव्य केलं आहे.

राधानगरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या तुरंबेयेथील प्रचारसभेत ते बोलत होते.

‘मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही काँग्रेसना साधा उमेदवार देता आला नाही.

त्यांच्या पक्षांची ताकद किती उरली आहे ते यावरुनच कळून येतं. मी कोथरुडमधून निवडून येणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही,’ असंही पाटील म्हणाले.

‘ईडी’ नाट्यानंतर ‘पवारांनी ईडीच्या प्रकरणाचा इव्हेंट केला’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

शरद पवार यांनी ‘ज्या माणसाने निवडणूकही लढवली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार’ असं प्रत्युत्तर दिलं होतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post