अहमदनगर : महाविद्यालयीन तरुणीला भरदिवसा केले किडनॅप


वेब टीम : अहमदनगर
श्रीगोंदा शहरातील स्वराज ट्रॅकटर शोरूमजवळून आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास १२ वीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच अपहरण झाल्याची घटना घडली.

 या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

अपहरण झाल्यानंतर त्या मुलीसोबत असणाऱ्या मैत्रिणींनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठत श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अपहरण कर्त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

अपहरण करणाऱ्या आरोपीवर याआधीच बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी व अपहरण झालेली तरुणी हे एकाच गावातील आहेत.

सदर मुलगी ही तिच्या मैत्रिणीसोबत आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास क्लासला जात असताना सदर आरोपी हा एका पांढऱ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीतून त्या मुलीजवळ आला.

शहरातील स्वराज ट्रॅकटर शोरूजवळुन या मुलीला हाताला धरून जबरदस्तीने तिला गाडीत ओढून तिचे अपहरण करत तिला पळवून नेले.

अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post