कर्जच फेडले नाही; धनंजय मुंडे यांच्या घराचा बँकेने घेतला ताबा


वेब टीम : पुणे
सदनिकेसाठी घेतलेल्या 1 कोटी 43 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली नसल्याने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडेच्या पुण्यातील फ्लॅटचा ताबा घेतला आहे. तर हा राजकीय कट असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.

मॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीत धनंजय मुंडे यांनी फ्लॅट खरेदी केला आहे. त्यासाठी त्यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून 1 कोटी 43 लाखांचे कर्ज घेतले होते.

मात्र, वेळेत कर्ज न जमा केल्याप्रकरणी बँकेने मुंडेना एक महिन्यांपुर्वी नोटीस पाठविली होती. तरीही कर्जाचा हप्ता जमा न केल्यामुळे दोन दिवसांपुर्वी बँकेने मुंडेच्या नावे असलेल्या फ्लॅटवर जप्ती आणली आहे.

संबंधित बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनिल भोसले यांच्या नियंत्रणाखाली होती. मात्र, एनपीए फुगल्यामुळे मे महिन्यांत आरबीआयने बँकेच्या आर्थिंक व्यवहारांवर निर्बंध आणले होते.

ऑक्टोबर महिन्यांत बँकेचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले असून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.


शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची नोटीस आली, त्यावेळी मी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने 30 ऑक्टोबरनंतर हे कर्ज जमा करण्याची विनंती बँकेच्या प्रशासनाला केली होती.

मात्र, विनंतीनंतरही बँकेने माझा फ्लॅट ताब्यात घेतला. मी कर्जाची काही रक्कम देऊ केली आहे. मात्र, मधल्या काळात काही आर्थिक अडचणी आल्याने उर्वरीत रक्कम जमा करु शकलो नाही.

लवकरच कर्जाची रक्कम भरणार असलो तरी हा माझ्याविरोधात राजकीय कट रचला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post