पुण्यातील दुचाकीस्वारांसाठी पोलिसांनी दिली 'ही' खूशखबर


वेब टीम : पुणे
पुण्यातील दुचाकीस्वारांना वाहतूक पोलिसांनी दिवाळी निमित्त एक भेट दिली असे म्हणायला हरकत नाही.

डेक्कन जिमखाना भागातील दुचाकी स्वारांसाठी बंद ठेवण्यात आलेला संभाजी पूल (लकडी पूल) आता कायमस्वरूपी खुला करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला.

त्यानुसार या पुलावरून दुचाकी वाहनांची वाहतूक बुधवारपासून सुरू झाली.

डेक्कन जिमखाना भागातील खंडोजीबाबा चौक ते टिळक चौक दरम्यान असलेला संभाजी पूल १९९४ पासून दुचाकी स्वारांसाठी सकाळी आठ ते रात्री साडेनऊ या वेळेत बंद ठेवला जात होता.हा पूल मोटार, पीएमपीच्या बस तसेच रिक्षाचालकांसाठी खुला ठेवला होता.

वाहतूक पोलिसांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत संभाजी पूल दुचाकींसाठी बंद ठेवल्यानंतर त्याचा ताण डेक्कन भागातील वाहतुकीवर पडत असल्याने नागरिकांची ही मागणी बरेच दिवस सुरू होती.

त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी संभाजी पूल पुन्हा दुचाकीस्वारांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला.

मध्यंतरी खडकवासला धरणसाखळीत झालेल्या मुसळधार पावसामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता.

भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर वाहतूक पोलिसांनी डेक्कन भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला होता.

संभाजी पूल पुन्हा दुचाकीस्वारांसाठी खुला करून देण्याचे परिपत्रक वाहतूक पोलिसांनी काढले.

संभाजी पूल सकाळी आठ ते रात्री साडेनऊ या वेळेत दुचाकीस्वारांसाठी बंद असे मात्र, परगावाहून येणाऱ्या दुचाकीस्वारांना या नियमाची माहिती नसल्याने नियमभंग होत असे.

याबाबतचे परिपत्रक ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post