भाजप विश्वासघातकी, मला फसवलं : जानकरांचा आरोप


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या असतानाच महायुतीत रुसवे-फुगवे सुरु झाले आहेत. 

महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत, भाजपने आपल्याला फसवल्याचा आणि पक्षाला धोका दिला असल्याचा आरोप केला आहे. 

तसेच दौंड, जिंतूरच्या जागेचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते घेणार असल्याचे सांगत असहकार्याचा इशारा दिला आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते.

महायुतीचे जागावाटप होऊन उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. जागावाटपात सेनेला १२४ जागा तर भाजपला मित्रपक्षांसह १६४ जागा मिळाल्या आहेत. 

यापैकी १५० जागांवर भाजपाने स्वतःचे उमेदवार दिले आहेत व उरलेल्या जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. जागावाटपात अन्याय झाल्याचे सांगत मित्र पक्ष नाराज झाले आहेत. 

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही पत्रकार परिषद घेत जागावाटपाविषयची नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.

जानकर म्हणाले, ‘जागावाटपाबद्दल बोलणं झालं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही झाली होती. पण भाजपने मला सरळसरळ फसवलं आहे. माझ्या पक्षाला धोका दिला आहे. 

दौंड, जिंतूर विधानसभा मतदारसंघाबाबत पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील. गंगाखेड मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी रत्नाकर गुट्टे हे तिथून रासपचे उमेदवार असतील. उमेदवार मागे घेण्याची सेनेला विनंती करु.’

उद्धव ठाकरे बरोबर बोलले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जागावाटपाबाबत बोलताना ‘भाजपने मित्रपक्षांना त्यांची जागा दाखवली’ असे विधान पण नंतर सारवासारव केली. जानकर यांनी आज बोलताना ‘ठाकरे बरोबरच बोल्ले’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post