जे कुणालाही शक्य नव्हतं ते मोदी, शहांनी केलं : पंकजा मुंडे


वेब टीम : बीड
2014 मध्ये अमित शहा भगवान बाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आपल्याला सामान्यांसाठीचं सरकार लाभलं.

आजच्या दिवसाला अमित शाह यांनी जितकं सीमोल्लंघन केलं आहे त्यापेक्षा मोठं सीमोल्लंघन यापुढे त्यांच्याकडून घडणार आहे.

देशात केवळ राष्ट्रभक्तीच सर्वांना एकत्र बांधू शकते. 370 कलम रद्द केल्यानंतर राष्ट्रभक्ती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी 370 कलम हटवून न्याय मिळवून दिला आहे.

अमित शाह यांच्या नेतृत्वात आपल्याला सीमोल्लंघन करायचं आहे. जे कोणालाही शक्य नव्हतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी करून दाखवलं आहे.

उसतोड कामगारांसाठी यापुढे पावलं उचलली जाणार आहेत. माझ्या भावांच्या हाती कोयता घेण्याची वेळ येऊ देऊ नका. आपलं नातं कधीच तुटणार नाही.

गोपीनाथ मुंडे यांनी जे काम हाती घेतलं आहे, तेच पुढे न्यायचं आहे. आज माझ्या कामाचं जे कौतुक झालं त्यामुळे मला कशाचीही अपेक्षा नाही. तुमच्या मान सन्मानासाठी काम करायचं आहे.

दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

दसरा मेळाव्यानिमित्त अमित शहा यांनीही भगवान गडावर हजेरी लावली. ‘उमेदवारी अर्ज भरताना मी पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेतला. तेव्हा ते मला खुश राहा म्हणाले.

त्यावेळी मला समजलं की मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणं आवश्यक आहे’ अशा शब्दांत पंकजा यांनी मोदींची स्तुती केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post