पीएमसी बँक गैरव्यवहार; केंद्राचा संबंध नाही : सीतारामन


वेब टीम : मुंबई
पीएमसी बँक गैरव्यवहाराशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केले. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचे काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे.

या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या गैरव्यवहाराशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत.त्या भाजप कार्यालयात आल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांच्यासमोर आंदोलन केलं आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली. यावेळी त्यांनी खातेदारांना आश्वस्त केले.

पीएमसी बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावाधीत भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसल्याची माहिती आरबीआयपासून लपवली.

कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली. या उपद्व्यापामुळे बँकेला ४३३५ कोटी रुपयांचा तोटा झाला. याच पैशांमधून हा गैरव्यवहार झाला.

हा सगळा गैरव्यवहार हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीच्या पुढाकारातून झाला. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा कट रचला. कर्जाची परतफेड न करता त्या रकमेचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी केला.

यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा गैरवयवहार उघडकीस झाला. या प्रकरणी आत्तापर्यंत १० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केले असून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (निलंबित) जॉय थॉमस यांनाही अटक झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post