5 हजारांची लाच घेताना पोलिस सापडला लाचलुचपतच्या जाळ्यात


वेब टीम : अहमदनगर
दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व जामीन लवकर होन्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपये लाच घेताना नगर तालुका पोलिस ठाण्याचा पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला.

संजय सूर्यभान डाळिंबकर, (वय-46, पोलिस नाईक, नगर तालुका पोलिस स्टेशन) असे लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

नेहमीच विविध कारणाने वादग्रस्त ठरलेले नगर तालुका पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार व त्यांची पत्नी आणि आई वडील यांचे विरुद्ध दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व जामीन लवकर होईल अशी मदत करण्यासाठी पोलिस नाईक डाळींबकर यांनी दि. 29 रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचा समक्ष तक्रारदार यांच्या कडे 8 हजार रुपये लाचेची मागणी केली.

 5 हजार रुपये लाचेची मागणी करून 29 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन आवारात आयोजित लाचेच्या सापळा दरम्यान पंचा समक्ष 5 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली.

हा सापळा हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आला होता.

श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर, दीपक करांडे, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि अहमदनगर यांनी यशस्वी कामगिरी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post