कोण नितीन नांदगावकर ?; मनसेचे नेते चिडले


वेब टीम : मुंबई
कोण नितीन नांदगावकर ? आमच्या पक्षामध्ये नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि आमच्यासारखे मनसैनिक आहेत,’ असं म्हणत मनसे नेते राजू पाटील यांनी नितीन नांदगावकर यांच्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठे नेते नितीन नांदगांवकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मनसेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाही नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत जाणं पसंत केलं.

त्यांच्या शिवसेनेत जाण्याने मनसे नेते आक्रमक झाले आहेत. मनसेचे नेते आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजू पाटील यांनी नितीन नांदगावकरांवर जोरदार टीका केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post