राम मंदिर निकालाची पूर्वतयारी; उत्तर प्रदेशात पोलीस, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द


वेब टीम : दिल्ली
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद पूर्ण झाला.

सर्वोच्च न्यायालय यावर १७ नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय सुनावणार आहे.

अयोध्येत १० डिसेंबर पर्यंत जमावबंदीचा आदेश (कलम १४४) लागू केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या ३० नोव्हेंबर पर्यंत रद्द केल्या आहेत.

उत्तर प्रदेश राज्य सरकारने या संदर्भात एक पत्रक जारी करून पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या.

राज्य सरकारकडून जारी केलेल्या पत्रकात सणांमुळे सुट्ट्या रद्द केल्याचे सांगण्यात आले असले तरी १७ नोव्हेंबरला अयोध्येचा निर्णय असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे १७ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

परंतु, या निकालानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामांवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post