वेब टीम : सातारा माजी खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची शैली चर्चेत आहे. त्यांच्या शैलीवरून विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्...
वेब टीम : सातारा
माजी खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची शैली चर्चेत आहे.
त्यांच्या शैलीवरून विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे यांना टोला लगावला आहे.
लोकांना काय आवडते याकडे लक्ष देऊ नये. छत्रपतींनी छत्रपतींसारखे वागावे, असे रामराजे यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा फलटणसह सातारा जिल्ह्यात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रामराजे राष्ट्रवादीपासून स्वतःला दूर ठेवून आहेत.
मात्र, ते भाजपमध्ये जाणार की, शिवसेनेत याविषयी संभ्रम आहे.
COMMENTS