ज्या राजांनी प्रजा सोडली त्यांच्याविरोधात मी लढणार : श्रीनिवास पाटील


वेब टीम : सातारा
मी कुस्ती करणार आहे, मी पैलवानाला धरणार आहे. ज्या राजांनी प्रजा सोडली आहे त्यांच्याविरुद्ध मी लढणार आहे.

मला तिसऱ्यांदा खासदार करा आणि दिल्लीला पाठवा. त्यानंतर बघा मी या जिल्ह्याला कसं नटवतो असं म्हणत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंविरोधात दंड थोपटले.

वाईमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मकरंद पाटील यांनी वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मोठं शक्तीप्रदर्शन करत दाखल केला.

यानंतर झालेल्या सभेत श्रीनिवास पाटील बोलत होते. भरभरून प्रेम करणाऱ्या शरद पवारांचा त्यांनी अपमान केला आहे असं म्हणत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा समाचार घेतला.

“मला आज नीट चालता येत नाही मी काय लढणार अशा अशी भाषा वापरणाऱ्यानी लक्षात घ्यावं की मी पैलवानाची कुस्ती करणार आहे. मला आजही नीट चालता येतं. मात्र काही लोक असेल आहेत ज्यांना नीट चालता येत नाही.

साताऱ्यातले लोक पाहात आहेत कोण कसे चालते आणि मी कसा चालतो. साताऱ्यातली जनताच निर्णय करणार आहेत असंही श्रीनिवास पाटील म्हणाले.

तीन-चार दिवसांपासून माध्यमांतील लोक मला विचारतात की, तुम्ही राजांशी कसे लढणार ? मी त्यांना सांगतो ज्या राजांनी प्रजा सोडली आहे, अशांबरोबर लढायला काय हरकत आहे सातारकरांचे चुकलं आहे.

मकरंद पाटील यांनी मागील दहा वर्षात मतदार संघात केलेल्या विकासकामांची आठवण करून देत जोरदार भाषण केले .

मतदारसंघातील महाबळेश्वर पाचगणी पर्यटन स्थळाला आंतरराष्ट्रीय दर्जा तर मिळावा. तेथील विकासाआड येणारे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, हरित लवाद, पर्यावरण आदी निर्बंध उठवावेत, शिवाजी महाराजांच्या प्रतापगडाचया पुनर्बांधणीबांधणीसाठी मंजूर असलेला अठरा कोटी रुपयांचा निधी या सरकारने उपलब्ध करून द्यावा असे सांगत मतदार संघातील अनेक जलसिंचन प्रकल्प, खंडाळा तालुक्यातील नीरा-देवघर, धोम बलकवडी, कवठे केंजळ, नागेवाडी, बोपर्डी तलाव अनेक जलसिंचन प्रकल्प पूर्ण करत आणले आहेत.सगळ्यांना पाणी मिळण्याची व्यवस्था केली आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post