राज्यात मतदारांनी या दिग्गजांना नाकारले


वेब टीम : मुंबई
परळी मतदारसंघाच्या निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. मराठवाड्यातील या मतदारसंघात पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यात काट्याची टक्कर झाली. निवडणुकीआधी या दोन्ही भावा-बहिणीमध्ये झालेला वाद, आक्षेपार्ह विधान, पंकजा मुंडे यांना आलेली भोवळ, धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जीवन संपवून टाकावे वाटणारे केलेले विधान या सर्व घडामोडीनंतर पार पडलेले मतदान.

परळीतील मतदार राजाने धनंजय मुंडेंच्या बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना १ लाख २१ हजार १८६ मते तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना ९० हजार ४१८ मते मिळाली. धनंजय मुंडे यांचा ३० हजार ७६८ मतांनी विजयी झाले.

माहिममधून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर विजयी झाले आहेत. या मतदारसंघात शिवसेना आणि मनसे या दोघांमध्ये प्रमुख लढत होती. खरंतर राज ठाकरेंसाठी ही होम पीचवरची लढाई होती. त्यामुळे सगळयांचे लक्ष माहिमच्या निकालावर होते. माहिममधून मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी सुद्धा प्रचारात पूर्ण जोर लावला.पण अखेर शिवसेनेने येथे बाजी मारली. शिवसेना आणि मनसे दोघांसाठी जय-पराजय प्रतिष्ठेचा विषय असतो. कारण माहिम विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे तर शिवसेनेचे पक्ष मुख्यालय शिवसेना भवन या मतदारसंघात आहे.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी पराभव केला आहे. झिशान हे ४,२८५ मतांनी विजयी झाले.झिशान काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र.मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती.वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात आहे. शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला.मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून या मतदारसंघात अटी-तटीचा सामना सुरु होता. वांद्रे पूर्व, खार पूर्व, कलानगर आणि वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्सचा काही भाग या मतदारसंघात येतो. १९९९ ते २००९ या काळात काँग्रेस उमदेवाराने विजय मिळवला. ही जागा २००९ पासून शिवसेनेकडे आहे.

सातारा येथील प्रतिष्ठेची लढत समजली जात होती. राष्ट्रवादीकडे पाठ फिरवत उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र यावेळेस त्यांना ५४ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार सभा घेतल्या. महाराष्ट्रातील पहिली सभा बीड जिल्ह्यात घेतलेल्या ठिकाणी देखील भाजपच्या पंकजा मुंडे आणि आता दुसरी सभा घेतलेल्या साताऱ्यात देखील जावे लागले.

मुक्ताई नगरमधून रोहिणी खडसे पराभूत झाल्या असून ,एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे

जालनामधून काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे उमेदवार व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post