धक्कादायक : 21 वर्षीय तरुणीला नग्न करून टाकले रेल्वे रुळावर


वेब टीम : अहमदनगर
अपहरण करून त्यानंतर एक 21 वर्षीय तरुणी हातपाय बांधलेल्या, तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या नग्न अवस्थेत विळद परिसरात रेल्वे रूळावर पोत्यात आढळ्ल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली.

या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशयही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. त्यामुळे याप्रकरणाचा छडा त्वरित पोलिसांनी लावावा अशी मागणी होत आहे.

ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणीची पोत्यातून सुटका केली. याबाबत रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास केल्यास धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. विळद परिसरातील रेल्वे रूळावर एका तरुणीला नग्न अवस्थेत, हात-पाय बांधून पोत्यात घालून आणून टाकले होते.

याची माहिती कळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तरुणीला पोत्यातून बाहेर काढले. कपडे घालण्यास दिले. तसेच विळद ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जगताप, दगडू जगताप यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, ही तरूणी पाथर्डी परिसरातील असून ती सध्या शेंडीबायपास परिसरात वास्तव्यास असल्याचे समजले. ही तरूणी गुरूवारी (दि. 21) गजानन कॉलनीत भाजी आण्यासाठी गेली होती.

त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून माझे अपहरण चौघांनी केल्याची माहिती या तरूणीने उपस्थितांना दिली. त्यामुळे या प्रकरणाची गाभीर्य वाढले आहे.

तीचे हात-पाय बांधलेले होते. यामहिलेची अवस्था पाहता तीच्यावर अत्याचार झाल्याचा संशय काहींनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post