सेन्सेक्सचा नवा विक्रम; पहिल्यांदाच 41,000 पार


वेब टीम : मुंबई
शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्सनं विक्रमी पातळी गाठली आहे. सेन्सेक्स मंगळवारी (दि.26) सकाळी व्यवहार सुरू होताच 41,022.85 अंकांवर खुला झाला.

पहिल्यांदाच सेन्सेक्स 41,000 अंकांच्या पल्याड खुला झाला. दुसरीकडे निफ्टी 36.45 अंकांनी वाढून 12, 110.20 अंकांवर खुला झाला.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संबंध सुधारण्याच्या अपेक्षा उंचावल्यानं सोमवारी आशियाई बाजारात तेजी दिसून आली.

 त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. जगातील प्रमुख शेअर बाजारही सोमवारी तेजीत होते.

चीन, जपान व कोरीया आदी आशियातील शेअर बाजारही एक टक्क्याने वधारले. भारतीय बाजारांवर याचाही चांगला परिणाम झाला.

सुरुवातीच्या व्यवहाराच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. 9 वाजून 28 मिनिटांनी सेन्सेक्सचे 216.48 अंकांच्या वाढीसह 41,105.71 अंकांवर व्यवहार सुरू होते.

 तर निफ्टी 56.45 अंकांच्या वाढीसह 12, 130.20 अंकांवर ट्रेड करत होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post