पोलिसांच्या वाहनाला गारखिंडी घाटात अपघात; पोलीस जखमी


वेब टीम : पारनेर
खा. डॉ. सुजय विखे यांना सुरक्षा देणार्‍या पोलीस वाहनास गारखिंडीच्या घाटात अपघात झाला आहे.

या अपघातात वाहनचालक पो. कॉ. पोपट मोकाटे यांचा पाय मोडला असून त्यांना पुढील उपचारासाठी विळद येथील विखे पाटील रूग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.

तर या अपघातात सपोनि. बालाजी पदमने यांच्यासह हे.कॉ. लोणारे, 2 होमगार्ड कर्मचार्‍यांना किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.6) सकाळी घडली.

या अपघाताची माहिती कळताच खा. सुजय विखे, राहुल शिंदे व डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी या पोलिस कर्मचार्‍यांना तातडीने मदत करून उपचारासाठी पाठविण्यात आले.

खा. सुजय विखे हे बुधवारी सकाळी 11 वाजता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणीसाठी पारनेर दौर्‍यावर आले होते.

भाळवणी, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या व मांडओहोळचा धरण दौरा आटोपून पिंपळगाव रोठा जवळ असणार्‍या गारखिंडी घाटात पोलीस वाहन (क्र.एम.एच.16, एन. 375) या वाहनाचा रॉड तुटल्याने गाडी 150 ते 200 फुट खोल दरीत कोसळली.

जखमींना उपचारासाठी दाखल केल्यानंतर क्रेनच्या साह्याने गाडी बाहेर काढण्यात आली आहे. अपघात झाल्याची माहिती समजताच स्वत: खा. विखे, डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी धाव घेत जखमी पोलिसांवर प्रथमोपचार करत पुढिल उपचारासाठी विळद येथील विखे पाटील रुग्णालयात दाखल केले.

अपघाता दरम्यान तेथून जात असलेल्या पिंपळगाव रोठा गावातील तरूण गोपीनाथ घुले याला वाहन दरीत कोसळल्याचे समजले.

त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह राहुल पाटील शिंदे यांच्या मदतीने तातडीने दोरखंडाच्या साहाय्याने खोल असलेल्या दरीत उतरून सर्व जखमी पोलिसांना सुखरूप बाहेर काढले व तातडीने जवळील दवाखान्यात दाखल केले.

तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी विळद येथे पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post