अहमदनगर : तारकपूर बस स्थानकासमोर सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलिसांचा छापा


वेब टीम : अहमदनगर
शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी आज दुपारी छापा टाकला.

या छाप्यात एक महिलेला ताब्यात घेतले आहे. तर एका पिडीत बांग्लादेशीय तरूणीची सुट्का कारण्यात आली आहे.

कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

तारकपूर परिसरात एका अपार्टमेन्टमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्रीशीर माहिती मिटके यांना मिळाली.त्यानुसार कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.

सुरवातीला दोघांना डमी ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यांना तेथे वेश्या व्यवसाय सूरू असल्याचे आढळून आले.

पोलिसांची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी (दि.22) रोजी दुपारी तेथे छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post