चिंकी यादवचे ऑलिम्पिकमध्ये स्थान पक्के


वेब टीम : दिल्ली
युवा नेमबाज चिंकी यादवने शुक्रवारी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये ११वी जागा निश्चित केली.

चिंकी पदकाला गवसणी घालणे शक्य नसले तरी तिने आपल्या कारकीर्दीत पात्रता फेरीतील सर्वोत्तम ५८८ गुण मिळवत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती तसेच जागतिक कनिष्ठ गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या चिंकीला पात्रता फेरीतील सातत्य अंतिम फेरीत राखता आले नाही.

त्यामुळे तिला ११६ गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post