आमच्याकडे खुन्नसने का पाहतोस? : तरुणास मारहाण


वेब टीम : अहमदनगर
आमच्याकडे खुन्नसने का पाहतोस? अशी विचारणा करुन चौघांनी शिवीगाळ व दमदाटी करीत लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी फायटरने बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील हॉटेल प्रियदर्शनी समोर सोमवारी (दि.25) 1 वाजता घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, किरण दंडवते, दादासाहेब पुंड, विजय शेळके व एक अनोळखी इसम (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दारु पिल्याच्या अवस्थेत असताना त्यांनी सचिन जयसिंग नांगरे (वय 33, रा.सावेडी) यास अडविले.

आणि ‘तू कायम आमच्याकडे खुन्नसने का पाहतोस?’ असे म्हटले. यावर नांगरे हा त्यास समजावून सांगत असताना चौघांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी फायटरने बेदम मारहाण करुन जखमी केले. आणि ‘तलवारीने कापून टाकू’ अशी धमकी दिली.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सचिन नांगरे याच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 324, 323, 504, 506 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post