मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी : फडणवीस


वेब टीम : मुंबई
आरे जंगलात होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर अवघ्या काही मिनिटांतच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांच्या निर्णयावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत स्थगितीच्या निर्णयाला दुर्दैवी म्हणले आहे. ‘जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते.

अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील.

मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे.

मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच,’ असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post