वेब टीम : दिल्ली सर्वोच्च न्यायालय उद्या (दि.९ नोव्हेंबर) सकाळी १०.३० वाजता देशातील सर्वांत जुना खटला असलेल्या अयोध्याप्रकरणावर निकाल ...
वेब टीम : दिल्ली
सर्वोच्च न्यायालय उद्या (दि.९ नोव्हेंबर) सकाळी १०.३० वाजता देशातील सर्वांत जुना खटला असलेल्या अयोध्याप्रकरणावर निकाल सुनावणार आहे.
यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.
सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्ट हा निकाल देणार आहे. ५ ऑगस्टपासून दररोज या प्रकरणी सुनावणी सुरू होती. ही सुनावणी १६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली.
निकालानंतर सामाजिक सलोखा आणि एकात्मता कशी टिकवून ठेवता येईल यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निवासस्थानी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांनी मुस्लिम धर्मगुरू, विचारवंत आणि अभ्यासकांची नुकतीच भेट घेतली.
निकालाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत आरएसएसकडून कृष्ण गोपाळ, रामलाल आणि माजी मंत्री शहानवाज हुसेन तसेच मुस्लिम समाजातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.
कुठल्याही परिस्थितीत सामाजिक सलोखा, बंधुत्व, एकात्मता अधिक बळकट करण्याचा निर्धार या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनी व्यक्त केला होता. सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल त्याचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे.
शांतता राखण्याचे आम्ही सर्वांना आवाहन करू, असे शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कालबी जावाद माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
COMMENTS