आता तुम्हीच सेना-भाजपला समजावा; रामदास आठवलेंना शरद पवारांचा सल्ला


वेब टीम : मुंबई
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. बिघडलेलं राजकीय वातावरण दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आताच्या परिस्थितीत काय करायला हवं हा सल्ला घेण्यासाठी पवारांची भेट घेतली, असे आठवले म्हणाले.

आठवले यांनी काळजीतून माझी भेट घेतली. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलेला असल्यानं आमची याबाबतची भूमिका मर्यादित आहे. तुम्हीच सेना-भाजपला समजावण्यासाठी जोमानं प्रयत्न करा, असं मी आठवलेंना सांगितलं, असे शरद पवार यांनी सांगितले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post