शिवसेनेचे हिंदुत्व हे बेगडी : आशिष शेलार


वेब टीम : मुंबई
ओळख परेड आरोपींची होते आमदारांची नाही असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी हा टोला लगावला आहे. आत्मबल गमावलेल्या नेत्यांनी एक टुकार प्रयत्न केला गेला असंही त्यांनी म्हटलं आहे.

हा जनमताचा अपमान आहे. आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असेल यात काहीही शंका नाही असंही आशिष शेलार म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचं नेतृत्त्व स्वीकारलं. यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? शिवसेनेचे बेगडी हिंदुत्त्व आहे असाही टोलाही शेलार यांनी लगावला.

आज १६२ आमदार असल्याचा कांगावा या तीन पक्षांनी जरुर केला. तिथे १४५ तरी आमदार होते का? याचं उत्तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला द्यावं लागेल असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आत्मबळ गमावलेल्या नेत्यांनी आज आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असंही शेलार यंनी म्हटलं आहे
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात स्थापन झालेलं सरकार आपलं संख्याबळ सिद्ध करेल.

पाच वर्षे दलित, पीडित आणि दुर्बल घटकांसाठीचं काम करणार असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post