अयोध्येत जमिनीला सोन्याचा भाव; चौपट दर वाढले


वेब टीम : अयोध्या
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर निर्माण आणि विकास योजनांच्या अपेक्षेमुळे जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

अयोध्येजवळ असलेल्या मांझा बरेहटा, सहजनवा, सहजनवा उपरहा, माझा उपरहा गावांत जमिनीच्या किमती चार पटीने वाढल्या आहेत.

अयोध्येला जोडणारा बाह्यमार्ग आणि रस्त्याला लागून असलेल्या जमिनींच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे.

लखनऊ आणि देशातील संपूर्ण भागातून व्यावसायिक स्थानिक लोकांशी संपर्क साधत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या सदर तहसीलचे उपनिबंधक एस. बी. सिंह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १२ नोव्हेंबरपासून जमिनीच्या खरेदीला वेग आला आहे.

एवढेच नाही तर रजिस्ट्रीमध्येही २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post