धक्कादायक : पोटच्या मुलीला विहिरीत ढकलून आईनेही केली आत्महत्या


वेब टीम : अहमदनगर
कोणत्या तरी गोष्टीचा राग धरुन 27 वर्षिय मातेने 4 वर्षिय चिमुकल्या मुलीस विहिरीत टाकुन तिचा खून केला. व स्वत: विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

ही घटना धनगरवाडी शिवारात शेख यांच्या शेतजमीनीत शुक्रवारी (दि.29) पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबतची माहित अशी की, कविता उर्फ निता सचिन कापडे (रा.धनगरवाडी, ता.नगर) या 27 वर्षिय महिलेने कोणत्या तरी गोष्टीचा मनात राग धरुन तिची मुलगी प्रणाली (वय 4) हिला विहिरीत फेकून तिचा खून केला व स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी प्रथम सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मात मृत्युची नोंद केली.

तपासात निष्पन्न झालेल्या बाबी वरुन सहायक फौजदार श्रीधर पालवे यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 302 प्रमाणे कविता कापडे यांच्या विरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंढे हे करीक आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post