वेब टीम : दिल्ली लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एससी,एसटी) आरक्षण आणखी १० वर्ष टिकणार आहे...
वेब टीम : दिल्ली
लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एससी,एसटी) आरक्षण आणखी १० वर्ष टिकणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पूर्वी २००९ मध्ये आरक्षणाला मुदतवाढ देण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता या निर्णयाला संसदेची मंजुरी मिळवण्यात येईल.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३४ नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एससी, एसटी आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यावेळी हे राजकीय आरक्षण १० वर्षांसाठी लागू करण्यात आले होते.
त्यानंतर १० वर्षांनी ते आणखी १० वर्षांसाठी वाढवण्यात आले. युपीए सरकारने २००९ मध्ये आरक्षण १० वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतल्यांनंतर आरक्षणाची मुदत २५ जानेवारी २०२० पर्यंत होती.
आता संसदेने मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी दिल्यास हे आरक्षण जानेवारी २०३० पर्यंत लागू होणार आहे.
COMMENTS