आधारकार्ड पुरावा नाही; बांगलादेशी महिला दोषी


वेब टीम : मुंबई
आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही, असं सांगत मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं एका 35 वर्षीय बांगलादेशी महिलेला भारतात अवैधपणे प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवलं.

तिला न्यायालयानं एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना तिला अवैधरित्या भारतात प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

’पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा सेल डीड आदी दस्तावेज कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे,’ असं न्यायालयानं निकाल देताना स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post