वेब टीम : नागपूर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बरेच तरुण आमदार विधिमंडळात निवडून आले. त्यामध्ये स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव दे...
वेब टीम : नागपूर
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बरेच तरुण आमदार विधिमंडळात निवडून आले. त्यामध्ये स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज हे देखील आहे. एखाद्या आमदाराने सभागृहात भाषण करायचे म्हटल्यावर, त्यासाठी तयारी करावे लागते.
पण यामध्ये पहिल्यांदा निवडून आलेले, धीरज यांचे कालचे भाषण पाहून, मला विलासराव देशमुख यांची आठवण झाली. कारण सभागृहात विलासराव भाषण करताना हात वारे आणि त्यांचा आवाज हे सर्व हुबेहुब धीरज दिसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अजित पवार यांनी सभागृहातील तरुण आमदारां बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अजित पवार यानी पत्रकारांच्या सुयोग निवासस्थानी संवाद साधला. त्यावेळी बऱ्याच प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. यावेळी अजित पवार म्हणाले की,मागील महिनाभरात बऱ्याचदा महाविकासआघाडीच्या नेत्यांची आणि मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहे.
त्या बैठकांना आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहिले आहेत. या बैठकी दरम्यान आदित्यकडे पाहिल्यावर वरिष्ट सभासदांशी आदराने बोलणे आणि तेवढाच सन्मान देताना दिसते. एका बाजूला प्रबोधनकार, बाळासाहेब, उद्धव यांचा वारसा लाभलेला असताना.
मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, असे त्यांच्यामध्ये आजपर्यंत दिसले नाही. अतिशय साधेपणा प्रत्येक वेळेस दिसला.त्याचबरोबर तीन ही पक्षातील नेत्यांसोबत मिळून,मिसळून राहण्याचा प्रयत्न करीत आहे. ही चांगली गोष्ट आदित्य यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS