भारतीय हवाई दलातील 'हे' विमान होणार इतिहासजमा


वेब टीम : जयपूर
भारतीय हवाई दलात जवळपास चार दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजवणाऱ्या ‘मिग-२७’ लढाऊ विमानांचे युग संपणार आहे. ‘मिग-२७’ श्रेणीतील सात लढाऊ विमानांचा प्रवास शुक्रवारी संपणार आहे.

जोधपूर हवाईतळावरून ‘मिग-२७’ विमानांना शुक्रवारी निरोप देणार आहे. यावेळी या श्रेणीतील सातही विमानांचे अखेरचे उड्डाण होणार आहे.

‘मिग-२७’ विमानांना अखेरचा निरोप देण्यासाठी हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानांची टीम जोधपूर एअरबेसवर पोहोचली आहे. सूर्यकिरण विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांच्या साक्षीने ‘मिग-२७’ विमानांचा सन्मान केला जाणार आहे.

यावेळी ‘मिग-२७’ श्रेणीतील सातही विमानांचे उड्डाण होईल. त्यानंतर हवाई दलाकडून या विमानांना सॅल्यूट केला जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post