घुसखोरांना स्थानबद्ध करण्यासाठी कर्नाटकात उभारले डिटेन्शन सेंटर


वेब टीम : बंगळूर
देशात कुठेही डिटेंशन सेंटर नाहीत असे वक्तव्य करून काही दिवस उलटत नाहीत तोच, कर्नाटक सरकारने पूर्वीच डिटेंशन सेंटर उभारल्याचे उघड झाले. बेकायदा घुसखोरांसाठी बेंगळुरूपासून ४० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नेलमंगलाजवळ हे सेंटर उभारले आहे.

देशात कुठेही डिटेंशन सेंटर नसल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानाच्या सभेत म्हटले होते.

मात्र, आम्ही कर्नाटकात घुसखोरांना स्थानबद्ध करण्यासाठी हे ‘डिटेंशन सेंटर’ उभारल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या सामाजकल्याण खात्याचे आयुक्त आर. एस पेड्डप्पैया यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली. कर्नाटक सरकारमधील गृहविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post