नगरमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी; वृद्धेस केली मारहाण


वेब टीम : अहमदनगर
भाडेकर्‍याबरोबर रिक्षाच्या पैशावरून वाद घालणार्‍या रिक्षा चालकास समजावण्याचा प्रयत्न करणार्‍या 65 वर्षीय वृध्देस रिक्षा चालकाने शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

ही घटना मंगळवारी (दि.10) दातरंगे मळा, घोडकेवस्ती, वारूळाचा मारूती रोड येथे घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात रिक्षा चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

जनाबाई ठकाराम घोडके (वय 60, रा. दातरंगे मळा, घोडके वस्ती, नालेगाव) यांचे भाडेकरू बनकर हे एका रिक्षा चालकाशी रिक्षा भाड्यावरून वाद घालत असताना जनाबाई रिक्षा चालकास समजावण्यासाठी गेल्या असता रिक्षा चालकाने जनाबाई व त्यांची सवत द्वारकाबाई व मुलगी ललीता यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

 या मारहाणीत जनाबाई घोडके या जखमी झाल्या. याप्रकरणी जनाबाई घोडके यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी रिक्षाचालक (क्र. एम एच 16 2112) याच्या विरूध्द भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 143, 147 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post