वेब टीम : दिल्ली देशभरात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा जोरदार रंगलेली असताना आता ‘एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार असल्याची माहिती ...
वेब टीम : दिल्ली
देशभरात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा जोरदार रंगलेली असताना आता ‘एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.
येत्या एक जूनपासून देशात एक देश, एक रेशनकार्ड सुरू करणार असल्याचे पासवान यांनी म्हटले. या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार आहे.या कार्ड अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत याची माहिती दिली.ही सुविधा ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात एक जूनपासून सुरू होणार आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.रेशन कार्डसाठी सध्या १४ राज्यात पॉश मशीनची सुविधा सुरू केली आहे.
तसेच लवकरच २० राज्यात आणि केंद्र शासीत प्रदेशात ही सुविधा सुरू करणार आहे. पुढील एक जूनपासून एक राष्ट्र, एक रेशन कार्ड सुरू करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे रामविलास पासवान यांनी म्हटले.
COMMENTS