धोनीची उलटी गिनती सुरु; बीसीसीआयने ‘अ’ श्रेणीच्या करारातून वगळले

file photo

वेब टीम : मुंबई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  (बीसीसीआय) आगामी हंगामासाठी केलेल्या करारांमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ‘अ’ श्रेणीच्या करारातून वगळले आहे. बीसीसीआयने गुरुवारी वार्षिक करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.

या यादीत महेंद्रसिंग धोनी याला स्थान मिळालेले नाही. गेल्या वर्षी धोनी ‘अ’ श्रेणीत होता. हा, धोनीने निवृत्ती घ्यावी, असा अप्रत्यक्ष संदेश मानला जातो आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक कराराचे चार भाग आहेत. अ +, अ, ब आणि क. ‘अ +’ श्रेणीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तीन खेळाडू आहेत. या तिघांना दरवर्षी सात कोटी रुपये मानधन मिळणार आहे. ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी पाच कोटी रुपये मानधन मिळेल.

या श्रेणीत रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ हे खेळाडू आहेत.

‘ब’ श्रेणीच्या वार्षिक करारात वृद्धिमान साहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवाल आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates