वेब टीम : मुंबई महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. गेल्या सोमवारी ही घटन...
वेब टीम : मुंबई
महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. गेल्या सोमवारी ही घटना घडली होती. सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक तरुणीवर उपचार करत होते.
मात्र, आज (सोमवार) अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर, हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
“अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसे या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
COMMENTS