यंदाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला 'या' चित्रपटाला


वेब टीम : लॉस एंजलिस
सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा ऑस्कर सोहळा अखेर पार पडला. अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरामध्ये डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये भारतीय चित्रपटांनी छाप पाडली नसली तरीदेखील भारतीय संगीताची झलक मात्र पाहायला मिळाली.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बॅकग्राऊंडला ऑस्कर पुरस्कार पटकवलेल्या ओरिजनल गाण्यांचा मोंटाज सुरु होता.

या मोंटाजमध्ये बॉलिवूड चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याचाही समावेश होता.

२२ जानेवारी २००९ मध्ये ८१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘जय हो’ या गाण्याला सार्वोत्कृष्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला होता.

यंदा मिळालेले सर्वोत्कृष्ट पुरस्कार
सार्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बोंग जो हो ( पॅरासाइट )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – जोकिन फिनिक्स ( जोकर )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी ज़ेल्वेगर (जुडी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाइट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पिट ( वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड )
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फिचर फिल्म – टॉय स्टोरी 4
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – हेअर लव्ह
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले – पॅरासाइट
सर्वोत्कृष्ट अ‍ॅडोप्टेड स्क्रिनप्ले – जोजो रॅबिट
सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म – द नेबर्स विंडो
सर्वोत्कृष्टओरिजनल स्क्रिनप्ले – बोंग जो हो ( पॅरासाइट )
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – जॅकलिन डुरान ( लिटिल वुमन )
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर – अमेरिकन फॅक्टरी
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट ( लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डर्न ( मॅरेज स्टोरी )
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटींग – फोर्ड वर्सेस फरारी
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग – मार्क टेलर आणि स्टुअर्ट विल्सन (1917)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – रॉजर डंकिन्स ( 1917 )
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटींग – फोर्ड वर्सेस फरारी
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट – 1917
सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फिल्म फिचर – पॅरासाइट
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर – जोकर
सार्वोत्कृष्ट संगीत – रॉकेटमॅन

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post