भर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरेंना म्हणाले; परत या... परत या...


वेब टीम : मुंबई
सहकारातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सर्व चकवा देणारे आहेत. त्यांच्याशी फार नाद करू नका. तुम्ही भाजपाच्या विचारांचे आहात परत एकदा मागे या… परत या… परत या,’ अशी साद मुनगंटीवार यांनी विधानसभेतच घातल्याने सभागृहात पुन्हा एकदा ठाकरे आणि भाजप चर्चेचा विषय झाला.

आज परत एकदा मुनगंटीवार यांनी भाजपाकडून भाषणात बोलता-बोलता मुख्यमंत्री ठाकरे यांना साद घातली. त्यामुळे विधीमंडळात खरंच शिवसेना-भाजप परत येणार का, त्याबाबत चर्चा सुरू होती.

विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशनला मुख्यमंत्री ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र होते. या दोन प्रमुख नेत्यांमध्ये परत एकदा मैत्री सुरू होत आहे, असे वातावरण असतानाच याच कार्यक्रमात ठाकरे यांनी मात्र भाजपाच्या नेत्यांवर नाराजी असल्याचे चित्र काही वक्तव्यावरून केले होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावरील पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री म्हणून बोलण्याची संधी आणि वेळही फडवणीस साहेब तुमच्यामुळेच आली,’ असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी पुस्त प्रकाशनाच्या कार्यक्रमात लगावला होता.

तसेच पुढील 5-10 वर्ष तुम्ही पुस्तकच लिहा असा सल्लाही दिला होता. त्याची विधिमंडळामध्ये चर्चा सुरू असतानाच आज मात्र भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post