वेब टीम : रियाध सौदी अरेबियात ११ भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही माहिती सौदीतील भारतीय दुतावासाने दिली. मदिना येथे चार रुग्णांच...
वेब टीम : रियाध
सौदी अरेबियात ११ भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही माहिती सौदीतील भारतीय दुतावासाने दिली.
मदिना येथे चार रुग्णांचा,मक्का येथे तीन रुग्णांचा मृत्यू,दोन रुग्णांचा मृत्यू जेद्दाह येथे, एका रुग्णाचा मृत्यू रियाधमध्ये तर एका रुग्णाचा मृत्यू दमाम या ठिकाणी मृत्यू झाला.
या संदर्भात वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले.
सौदीतील भारतीयांनी काळजी करु नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवलात तर गोंधळाचे वातावरण उगाचच तयार होईल.
त्यामुळे सोशल मीडियाचा वापर अफवा पसरवण्यासाठी करु नका असे ही आवाहन केले.
कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा तिरस्कार पसरवण्याचा प्रयत्न नको असे ही सांगण्यात आले.
“कोरोनाची लागण ही कुठलाही धर्म, जात किंवा पंथ पाहून होत नाही.
करोना विषाणूची लागण ही कुणालाही होऊ शकते.” असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
त्याचे ही उदाहरण देत कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.
कोरोनामुळे जे रुग्ण सौदीत अडकले आहेत त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात आहे.
त्यांच्या जेवणाची आणि औषधोपचाराची व्यवस्थाही केली आहे असे ही सौदीतील भारतीय दुतावासाने स्पष्ट केले.