वेब टीम : भुवनेश्वर देशभरात लॉकडाउन वाढवण्याची चर्चा सुरू असताना ओडिशा सरकारने मोठे पाऊल उचलत राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला...
वेब टीम : भुवनेश्वर
देशभरात लॉकडाउन वाढवण्याची चर्चा सुरू असताना ओडिशा सरकारने मोठे पाऊल उचलत राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार ओडिशा सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवल्याची घोषणा केली.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या निर्णयाची माहिती दिली.
या बरोबरच या कालावधीत केंद्र सरकारने ट्रेन आणि विमानसेवा सुरू करू नये अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली.
या बरोबरच राज्यातील सर्व शिक्षणसंस्था येत्या ७ जून पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही ओडिशा सरकारने घेतला आहे.
या दरम्यान शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठेही बंद आहेत.
देशात येत्या १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन आहे. या बरोबरच रेल्वे वाहतूकही पूर्णपणे बंद आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी मात्र मालगाड्या सुरू ठेवल्या आहेत.
या पूर्वी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना लॉकडाउन वाढवण्याचा सल्ला दिला.
ओडिशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी दोन रुग्णांना घरी सोडले आहे.
तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भुवनेश्वरमध्ये ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता.
कोरोनामुळे राज्यात झालेला हा पहिला मृत्यू होता.
या ७३ वर्षीय व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला आणि तपासणीत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते असे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.
COMMENTS