धक्कादायक... अवघ्या २५ व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने केली आत्महत्या...


वेब टीम : इंदूर
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने इंदूरमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ती २५ वर्षांची होती. या घटनेने प्रेक्षाच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला आहे.

तिच्या आत्महत्येमागचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. एक वर्षापूर्वी ती मुंबईला राहण्यासाठी आली होती.

कोरोना व्हायरसच्या काळात प्रेक्षा मुंबईहून घरी आली होती. मात्र तिच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


तिच्या जाण्याचे कारण जरी समजले नसले तरी डिप्रेशनमुळे तिने हे पाऊल उचलले असावे, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिच्या इंस्टा स्टोरीवरून निराशाजनक पोस्ट शेअर केली होती.

प्रेक्षा ही इंदूरमधील बजरंगनगरमधील तिच्या घरात राहात होती. सोमवारी रात्री तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती, असे तिच्या घरचे सांगतात.

प्रेक्षाला जेव्हा तिचे बाबा सकाळी उठवायला गेले तेव्हा त्यांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यांनी लगेच तिला हॉस्पिटलला नेलं.

परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रेक्षाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने क्राईम पेट्रोल दस्तकच्या काही एपिसोडमध्ये काम केले आहे.

लाल इश्क आणि मेरी दुर्गा या मालिकांमध्येही तिने काम केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post