वेब टीम : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३७ अहवालापैकी ३३ अहवाल निगे...
वेब टीम : अहमदनगर
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३७ अहवालापैकी ३३ अहवाल निगेटीव आले आहेत.
यात, पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील २५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
आता उर्वरित ४ अहवालाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील एक व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते.
तसेच उर्वरित १२ अहवाल काल रात्री उशीरा प्राप्त झाले होते. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
COMMENTS